Skip to main content

खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपिरे

अध्यात्मिक आणि धार्मिक विषयी.

अध्यात्मिक वसा आणि वारसा लाभलेल्या खूप हिन्यांनी समृध्द असणाऱ्या खुपीरे गावात दर तीन वर्षांनी बिरदेवाची जळ यात्रा भरते

ग्रामपंचायत खुपिरे

कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेले खुपिरे गाव, गावातील नवरात्र उत्सव परंपरा मोठी आहे.

शिवजयंती उत्सव

ग्रामपंचायत खुपिरे

ग्रामपंचायत खुपिरे

शिवजयंती उत्सव

ग्रामपंचायत खुपिरे

दुर्गा दौड

राजकारण, सत्ता कारण, अर्थकारण, पद ,पैसा, प्रसिद्धी ,जात-पात, पक्ष-प्रांत , संघटना – मंडळ ,सुशिक्षित – अशिक्षित,गरीब-श्रीमंत , उच्च – नीच , लहान-मोठा असे सर्व भेदभाव लाथाडून देव देश धर्माच्या कार्यासाठी आणि श्री शिवशंभु रूपी रामराज्याच्या मागणीस व संपूर्ण हिंदू समाज भगव्याच्या छत्रछायेखाली एकत्र आणण्याचा उत्सव म्हणजे श्री दुर्गामाता दौड.

दुर्गा दोड दसऱ्यामध्ये नऊ दिवस पहाटे केली जाते,यामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा सहभाग असतो लहान मुली महिला यांचा सहभाग अग्रस्थानी असतो.शिवगर्जना, शिवघोषणा आणि शिवकालीन गाणी म्हणत दुर्गा दौड काढली जाते.शुभ्र पांढरा पायजमा कुर्ता डोक्यावर भगवी टोपी कमरेला शेला असा दुर्गा दौड मध्ये सर्वांचा पेहरावा असतो.गावातील सर्वजण गट तट विसरून शिवमय होतात.

निद्रिस्त असलेला हिंदू समाज जागा करण्यासाठी व औरंगजेब रुपी डोके वर काढू पाहणाऱ्या हर एक मुघलास नेस्तनाभुत करण्यासाठी प्रत्येक धारकरी बांधवाने या दौडीत सहभागी झालेच पाहिजे.

दुर्गा दौड

ग्रामपंचायत खुपिरे

भजनी मंडळे

ग्रामपंचायत खुपिरे

ग्रामपंचायत खुपिरे

भजनी मंडळे

जल (जळ) यात्रा

श्री बिरदेव व मसोबा यात्रा

श्री बिरदेव व मसोबा यात्रा, खुपीरे, ता. करवीर

अध्यात्मिक वसा आणि वसा लाभलेल्या खूप हिन्यांनी समृध्द असणाऱ्या खुपीरे गावात दर तीन वर्षांनी बिरदेवाची जळ यात्रा भरते… अख्याईकेनुसार सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस धनगर समाज खुपीरे मुक्कामी आला. सांगोल्याहून भिल्लवडी मार्गे अक्कलखोपच्या मसोबाला प्रसन्न करून वारणानगर कोडोली या ठिकाणी धनगाराच्या दोन जोडी राहू लागल्या. तथस्थित स्वयंभू बिरदेव ही लोकरीच्या जाळ्यात विनत खुपीटे येथे आले. इथल्या निसर्गसंपन्न वातावरणात त्यांना रहायला आवडू लागले. मोगरबंच्या या गावातील ठिकाणी ते राहत. मोगराच्या झाडांची गर्दी असलेल्या या भागात मोगरबंच्या असे म्हणतात. या ठिकाणी बिरदेवाने मुक्काम केला. आज गावात 150 हून अधिक उंबऱ्यांचा धनगर समाज राहतो. श्री शंकाटाचा बारावा रूद्र अवतार म्हणून बिरदेवाने रूप घेतले आहे. बिरदेवाचे लग्न ठरल्यानंतर बिरोबा हे चिंचणी मायाक्का या बहीणीच्या भेटीसाठी चालले होते. वाटेत कृष्णा-कोयना या नदीमध्ये असणाऱ्या सात जणी बहीणींनी त्यांना अडवले. आणि जलामध्ये घेऊन गेल्या. त्या ठिकाणी देवाची हळद काढून केळवाणाचे प्रिती भोजन केले. निरोपाच्या वेळेस सात बहिणींनी भाऊराया पुन्हा कधी भेटणार? असा प्रश्न केला. क्षणभर विचार करून बिरदेवाने दर तीन वर्षानी फाल्गुन महिन्यात मी तुम्हाला भेटेल. असे सांगून यांचवेळी तुमचे आहेर-माहेर करीन असा शब्द दिला. यालाच जल (जळ) यात्रा असे नांव पडत गेले. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्या दिवशी बिरदेवाला महाअभिषेक घातला जातो. बिरदेवाला गोड्या नैवेद्याचा मान आहे. कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातून जवळपास 25 गावातील ढोलवादक एकत्र येऊन जागर करतात. व देव जळास घेऊन जातात. जळाहून आलेनंतर बिरदेव मंदिरात प्रवेश करतेवेळी बकटा बळी देणेची प्रथा आहे. तलवाटीच्या एकाच घावात हा बळी दिला जातो. देवाच्या पाठीमागे असणाऱ्या दैतास ही बलादूरी देणेची प्रथा आहे. रात्री पै-पाहुण्यांना जेवणासाठी निमंत्रण दिले जाते. व सायंकाळी 5 च्या सुमारास सबिना काढला जातो. आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते. चालू वर्षी देवाच्या भंडाऱ्याच्या पुजेचा मान तुकाराम नागोजी हटाळे, कृष्णात बाबू हटाळे, अवघडी शिंगाडी हटराळे, यशवंत बिरु हराळे यांच्याकडे आहे. यात्रा सफल होण्यासाठी समस्त धनगर समाज यांनी अफार कष्ट घेतले आहे.

श्री बिरदेव व मसोबा यात्रा

ग्रामपंचायत खुपिरे

कार्तिक यात्रा

ग्रामपंचायत खुपिरे

कार्तिक यात्रा

रामस्वामी मंदीराची ख्याती / धार्मिक व पौराणिक महत्व

ग्रामपंचायत खूपीरे, ता. करवीर येथील रामस्वामी महाराजांची कार्तिक यात्रेला जिल्ह्यातून हजारी भाविक कार्तिक यात्रेत दर्शनासाठी येतात. या यात्रेस शंभर वर्षाची परंपरा आहे.

कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात भीगावती नदीच्या काठावर बसलेले खुपीरे गाव विशाल तीर्थयात्रेनंतर हीणारी मीठी यात्रा म्हणून कार्तिक यात्रेचा उल्लेख केला जाती. तेथील ग्रामदेवत मारुती आहे. गावच्या दक्षिणेला श्रीराम स्वामी मंदीराचा सुमारे शंभर वर्षापूवीचा मठ आहे. त्याकाळी तासगांव तालुक्यातील जुळेवाडी येथून रामस्वामी नावाचे महाराज येथे आले. ग्रामस्थांनी पाटील भावकीचे शेतात पिंपळाच्या झाडाखाली त्यांचे आसनस्थान केले. अवघ्या १५ दिवसां नंतर महाराज तेथून निघून गेले होते. राम स्वामी महाराज कार्तिक स्वामीचे भक्त होते. म्हणून कार्तिक नावाचा गजर व जय करत नागरिकांनी यात्रेला सुरुवात केली. पुढे ती कार्तिक यात्रा नावा रूपाला आली. विशाल तीर्थ याने नंतर येणारया पहिल्या मंगळवारी कार्तिक यात्रा सुरु झाली. पुढे जागरूक देवस्थान म्हणून रामस्वामी मंदीरास महत्व प्राप्त झाले. जिल्ह्यातून भाविक याठिकाणी दर्शनास येऊ लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली रामस्वामी बसले होते. त्या पिंपळ वृक्षालाही महत्व प्राप्त झाले. मंदीरामध्ये रामस्वामी यांची बसण्याची गादी असून या गादीवर त्यांच्या प्रतिमेची पूजन केले जाते. तसेच समीर, त्यांच्या पादकांचेही पूजन केले जाते. भक्तांनी दान केलेल्या रामस्वींच्या घोड्यांच्या मतीचे पूजन केले जाते. पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या महादेवाच्या पिंडीचे पूजन करण्यात येते. मंदीर जुने व छोटे असले तरी कीती मीठी असे ठिकाण आहे. मंदीरामध्ये कर्नाटकातून भक्त म्हणून आलेले हनुमंत मीटनार व त्यांचे वडील यात्रेनिमित्य पूजा बांधत होते. दर्शनासाठी पंचक्रोशीतील खूपीर, साबळेवाडी, शिंदेवाडी, दीनवडे, वाकरे, कुडिने, यवलूज, नीटवडे येथील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्त अन्न धान्य दान करतात. त्यातून सुमारे तीन ते चार किंटल गव्हाची खीर प्रसाद म्हणून वाटली जाते. हा मुख्य यात्रेचा दिवस शाकाहारी दिवस म्हणून पाळला जाती. मंदीर समिती तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते. यात्रेस राम्स्वमीचा घीडा हे प्रमुख श्रद्धा स्थान म्हणून यात्रेदिवशी उपस्थित असते.

तसेच प्रत्येक आमावस्या व पौर्णिमेला पंचकोशीतील भाविकांची गदी असते. रामनवमीस ही भाविकांची प्रचंड गदी असते व त्यादिवशी मंदीर कमिटी तप महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे शंभर वर्षाचे परंपरा असणारी रामस्वामी मंदीर आहे.

मठ परिसरात याठिकाणी कै. दत्तू रामा पाटील, कै.धोंडी येसबा पाटील, कै. रामा येसबा पाटील यांची शेतजमीन आहे. त्यामधील या लोकांनी स्वमालकीची २० गुंठे शेतजमीन मठासाठी सीडले आहे  तेथे ७० ते ८० वर्षापूवी मठ बांधण्यात आला. त्या मठाची २०२१ मध्ये पडझड होऊन मटाची एक मिंत पडली.

वर्षाला कार्तिक यात्रेला मा. आमदार नरके साहेब आवर्जुन भेट द्यायचे व प्रत्येकाचे मठातील जागा ग्रामपंचायतच्या नावावर करा व मी काय लागेल तेवढा फंड लावती. त्यानंतर पाटील भावकीने २ गुंठे जागा ग्रामपंचायत खुपीरेच्या नावे स्वखर्चाने केली. त्यानंतर मंदिराला ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून दर्जा पण मिळाला. त्यानंतर श्री. संजय बळवंत पाटील (दादा) यांच्या प्रयत्नातून खा. संजय मंडलिक यांच्या फंडातून २१ लाख रुपये व मा. आम. चंद्रदिप नरकेसी यांच्या विशेष पर्यत्नातून १२ लाख रुपये निधी प्राप्त झाला. व मंदिराच्या बांधण्यास ख-या अर्थानी सुरवात झाली मंदीरातील गाभारा बांधकाम, फरशी, दगडी कमान व मूती साठी पाटील भावकी तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीनी व भक्तींनी सरळ हातानी मदत केली. व मंदीर पूर्णत्वास आले. याबद्दल श्री रामस्वामी मठ व्यवस्थापन समिती सर्व देणगीदाराचे शतशः आभारी आहे,

|| श्री राम स्वामी मठ ||

गणेशोत्सव

ग्रामपंचायत खुपिरे

ग्रामपंचायत खुपिरे

गणेशोत्सव

पूर्वीच्या पद्धतीन सुरू करून या विकास समितीने गावाचा एकोपा अबाधित ठेवण्याच्या तसेच कामाचा वारसा वाखाणले जाते. दरवर्षी दोन्ही तालीम मंडळांकडून श्रावण महिन्यात महाप्रसाद वाटप केले जाते. गावात ३० ते ३५ वर्षे अखंडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसाद चालू आहे. गावातील विविध संस्था, गावातील नागरिकांनी, माजी सरपंचानी आपापल्या कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे चालवून नावारुपाला आणल्या आहेत. गेली १८ वर्षे अखंडीतपणे जपला आहे गावाचे वैशिष्ट्ध असे की, गावची लोकसंख्या कमी आहे पण एकूण कार्य मोठे आहे. तसेच स्वामी समर्थ मंडळाकडून गेली ११ वर्षे दत्त जयंतीला महाप्रसादाचे वाटप चालू आहे. खरे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारी गावातळे आहे. आजमितीस या तळ्यातील पाणी केंव्हाच आटलेले नाही. जोतिर्लिंग यात्रा कमिटीने मंदिराची रंगरंगोटीचे काम लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. आरतीचे गावकरी मानकरी : पाटील भावकी, मगदूम भावकी, चौगले भावकी आहेत.

          सध्या गावातील ज्योतिर्लिंग देवालय व इतर धार्मिक स्थळांना सन २०२४/२५ मध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. ही गावासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे.