सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.
खुपीरे हे गाव कोल्हापूर पासून १० कि.मी. अंतर्वर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६८९२ आहे. यामध्ये पुरुष ३७०२ व स्त्रिया ३१९० असून गावात एकूण १३५२ कुटुंब आहेत. गावामध्ये रस्ते व वाहतूक उत्तम आहेत. तसेच गावात विकास सोसायटीचे जाळे कार्यरत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय येथे सेवा नागरीकांना उपलब्ध करून दिली जाते. शैक्षणिक दृष्ट्या गावामध्ये प्राथमिक शाळा, गावाच्या पूर्व दिशेने भोगावती नदी बारमाही वाहते. त्यामुळे जलसिंचनाच्या माध्यमातून गाव समृध्द आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गावामधील लोकांचा व्यवसाय शेती आहे. भात.ऊस, मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावामध्ये सर्व धर्माचे लोक जसे हिंदू, मुस्लीम, बौद्ध, हरीजन सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.सर्व धर्मियांचे सन एकत्रित साजरे केले जातात. गावामध्ये हनुमान मंदिर असून ‘क’ वर्ग देवस्थान वर्ग मध्ये आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे. असे हे गाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक गाव आहे. गावास राजकीय वारसा असून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्यावर गावातील प्रतिनिधी काम पाहत आहेत. गावात प्रसिद्ध गाव तलाव आहे. |









