ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेला परवानगी मिळावी या बाबत जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण साहेब (CEO) यांना निवेदन देताना खुपिरे गावच्या सरपंच व ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्ष दिपाली रमेश जांभळे. व उपस्थित खुपिरे चे उपसरपंच युवराज पाटील, साबळेवाडी चे उप सरपंच नामदेव पाटील,व खुपिरे ग्रामपंचायत सदस्य भगवान हराळे देवदास कांबळे.
खुपीरे गावचा पाणीपुरवठा चालू खुपीरे गावातील पेयजल योजनेच्या इलेक्ट्रिक पोल मधील ट्रान्सफर मध्ये व बांधलेल्या खोलीमधील इलेक्ट्रिक पॅनेलमध्ये पुराचे पाणी आल्यामुळे खुपीरे गावचा पाणी पुरवठा बंद होता.लवकरात लवकर पाणी चालू करायचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खुपीरे गावचे सरपंच, डे-सरपंच, सर्व सदस्य व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक यांनी बालिंगा येथून पाण्यातील बोट आणून जवळजवळ 400 फूट आत जाऊन पाण्यामध्ये बुडालेले सर्व इलेक्ट्रिक साहित्य बाहेर काढून नवीन इलेक्ट्रिक साहित्य जोडले.सदर पाणी चालू करण्यासाठी आपल्या गावचे मिस्त्री राजू पाटील (गुजा पाटील), तसेच आपल्या गावचे वायरमन शुभम शिंदे, अभिजीत पाटील, केटकाळे कॉन्ट्रॅक्टर व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
💐गणपती बाप्पा मोरया.💐 देवाची मूर्ती पुरुषांनीच घ्यायची या पारंपारिक विचारसरणीला छेद देत ग्रामपंचायत खुपीरे येथे खुपीरे गावच्या सरपंच सौ दिपाली जांभळे व ग्रामपंचायत सदस्य महिलांनी बाप्पांचे सारथ्य केले. बळवंत कुंभार शिपाई यांच्या घरातून गणेश मूर्ती मोठ्या थाटामाटात व मोरयाच्या जयघोषात आणण्यात आली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आज आपल्या खुपीरे गावामध्ये शिवार फेरी चे नियोजन करण्यात आले. सदर शिवारफेरीस माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी ,ग्रामसेवक ,कृषी सहाय्यक,कोतवाल,पोलीस पाटील,तंटामुक्त अध्यक्ष,आशा सेविका व पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते
स्पार्टन ग्रुप च्या वतीने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये खुपीरे गावचे सरपंच सौ दिपाली जांभळे यांनी रक्तदान केले
आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी माननीय प्रांत साहेब व तहसीलदार साहेब तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी व माननीय वैद्यकीय अधीक्षक यांच्या आदेशावरून "हर घर दस्तक" मोहिमे अंतर्गत २० नोव्हेंबर अखेर आपले खुपीरे गावामधील कोविड लसीकरण १००% पूर्ण करण्यासाठी वार्ड क्रमांक १ मध्ये घरोघरी जावून लाभार्थींना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करताना गावच्या सरपंच दिपाली जांभळे, सदस्य सागर पाटील,भगवान हराळे, ग्रामसेवक कृष्णात गुरव साहेब, आरोग्य सेवक मिठबावकर साहेब,मुल्ला मॅडम,आशा सेविका, व अंगणवाडी शिक्षिका,मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारी
खुपीरे ता. करवीर च्या महिला सरपंच सौ दिपाली रमेश जांभळे यांना लोकमतचे मालक राजेंद्र दर्डा यांचे कडून महिला सरपंच म्हणून सन्मान व शुभेच्छा पत्र लोकमत चे पत्रकार प्रकाश पाटील यांनी सुपूर्द केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच युवराज पाटील, रमेश जांभळे,ग्रामसेवक कृष्णात गुरव साहेब
महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत ग्रामपंचायत खुपिरे येथे कुकिंग क्लासेस समारोप कार्यक्रम तसेच फूड फेस्टिवल कार्यक्रम आयोजित केलेला होता. सदर कार्यक्रमामध्ये उपस्थीत महिला वर्गाला मार्गदर्शन करताना खुपीरे गावच्या सरपंच सौ दिपाली रमेश जांभळे.
खुपीरे गावामध्ये आज अरुण नरके फाउंडेशन आणि ऑरेंज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य शिबीर (मोफत आरोग्य तपासणी, सल्ला आणि मार्गदर्शन) बिरदेव मंदिर खुपीरे येथे घेण्यात आले. सदर आरोग्य शिबिरामध्ये 150 नागरिकांनी लाभ घेतला.
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त ग्रामपंचायत खुपिरे येथे ध्वजारोहन करण्याचा मान ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा कर्मचारी श्री गजानन बापू कुंभार यांना देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यमान सरपंच सौ दिपाली जांभळे, उप सरपंच, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी,शिक्षक विद्यार्थी, कामगार वर्ग
ग्रामपंचायत खुपीरे ता. करवीर येथे लोकराजा राजर्षी शाहू यांच्या पुण्यतिथी निमत्त 100 सेकंद स्तब्धता पाळणेत आली. यावेळी उपस्थीत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्रा.प.कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, शिक्षक, विद्यार्थी व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. #राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज #स्मृतिशताब्दी
खुपीरे ग्रामपंचायत वतीने वृक्षारोपण करताना खुपीरे गावच्या सरपंच सौ दिपाली जांभळे, उप सरपंच श्री युवराज पाटील, खुपीरे गावच्या पोलीस पाटील सौ सविता गुरव मॅडम, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर पाटील, श्री अमर कांबळे ग्रामविकास अधिकारी श्री कृष्णात गुरव, श्री शिवाजी गुरव साहेब, श्री रमेश जांभळे व ग्रामपंचायत कर्मचारी.
खुपीरे गावातील सर्व ग्रामस्थांना विनम्र आवाहन,,,! आपले खुपीरे गाव तसे नेहमीच सामाजिक उपक्रमाला हातभार लावणारा गाव. जे जे काही चांगल आणि योग्य आहे,,,, अशा सर्वच उपक्रमाला माझे गावकरी बांधव गट-तट, पक्ष न मानता नेहमी साथ देत असतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक चांगल्या नवनवीन योजना ह्या आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि गावाबद्दलच्या आत्मियतेमुळं यशस्वी झाल्या,,,,,! अशीच आणखी एक महत्वाची आणि अत्यंत सर्वांसाठी गरजेची असणारी योजना आपल्या सर्वांच्या सहकार्यांनं महाराष्ट्राला एक दिशा देणारी योजना आम्ही ग्रामपंचायत च्या सहकार्याने राबवणार आहोत, ती म्हणजे,,,, "मोफत शवदहन योजना",,,,! म्हणजेच "शेवटची फुले (लाकुड व शेणी)" ग्रामपंचायतीची आपल्या कोल्हापूरात अजूनही एक जुनी म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे, जन्म कुठेही होवो,,, पण मरण बाकी आपल्या कोल्हापूरातच यावं,,,,! याचं कारणच असं आहे की, गेली अनेक वर्षे झाली, आपल्या कोल्हापूरात श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, कुठल्याही जाती धर्माचा असो वा पंथाचा,,,, किंवा बेवारसही असो,, कुणाचंही प्रेत असो, आपलं कोल्हापूर त्या प्रेताला आपल्या पंचगंगा स्मशानभूमीत अगदी आपलं समजून मोफत अनंतात विलीन करतं,,,,! हे ऐकून व पाहून माझ्या हि मनात एक विचार आला की, एवढ्या मोठ्या कोल्हापूर सारख्या शहरात, जिथे शेणी, लाकडाची वाणवा, त्यात शहरी भाग, हजारो माणसं वर्षाकाठी मृत्यू पावतात,,,तरीही गेली वर्षानूवर्ष हा उपक्रम अगदी विनाखंडीत आणि विनातक्रार मोफत सुरु राहत असेल तर मग आपल्या खुपीरे गावात हे का घडू शकत नाही,,,? का आम्ही आमच्या गावक-यांच्या दुःखाचा थोडा का असेना भार हलका करु शकत नाही,,,? हा विचार माझ्यासह सर्वच ग्रा.पं. सदस्यांच्या मनात आला, आणि ठरवलं की ,आपण ही *मोफत शवदहन योजना,,,अर्थात "शेवटची फुले (लाकुड व शेणी) ग्रामपंचायतीची" या नावाने आपल्या सर्वांच्या साक्षिनं आणि सहकार्यानं सुरु करायची,,,,! एक सामाजिक भावना मनात ठेवून उचललेलं हे पाऊल निश्चितच महाराष्ट्राला एक नवी दिशा देईल यात शंका नाही,,,,! आपला खुपीरे गाव आपल्या सर्वांच्या सहकार्यानं पुढे जातो आहे,,,याचा आम्हांला अभिमान आहे. उदयाचा आपला होळी सण आवश्यक तेवढ्याच शेणीचा वापर साजरा करा,,,,! पण उर्वरीत शेणी व लाकडे दान म्हणून ग्रामपंचायतकडे सुपुर्द कराल? आणि एका चांगल्या, योग्य आणि खरोखरच आवश्यक असलेल्या योजनेला आपण हातभार लावाल अशी अपेक्षा करते,,,,! चला तर मग सुरुवात करुया, एका नव्या पर्वाला,,,,! महाराष्ट्रात पोहचवूया,,,, आपल्या खुपीरे गावाला,,,,! ------ सौ.दिपाली रमेश जांभळे. सरपंच श्री सागर मारुती पाटील. उप- सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य खुपीरे.ता.करवीर.
नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर 1 जानेवारी 2023 पासून आपल्या गावातील लाडकी मुलगी लग्न करून सासरला जाताना ग्रामपंचायतीकडून माहेरची भेट म्हणून गावांतील माझ्या प्रत्येक नववधू मैत्रीणी, भगिनींसाठी 2000/- रुपये रक्कमेची "माहेरची साडी" ग्रामपंचायत खुपीरेच्या वतीने "माहेरचा आहेर"म्हणून भेट देण्याचा निर्णय घेतला होता, तरी आज आपल्या गावांतील कु सायली सरदार नाईक व धनश्री संभाजी निकम यांच्या लग्नाची नोंद ग्रामपंचायतकडे आलेली होती. सदर योजनेची अंमलबजावणी चा कार्यक्रम आज सरपंच सौ दिपाली जांभळे, उपसरपंच श्री सागर पाटील व सर्व ग्रामपंचायत सहकारी यांच्या हस्ते नववधू मैत्रिणींना साडी भेट देऊन करण्यात आला.
@एक सुवर्ण क्षण@....राज्य शासनाने विधवा प्रथाबंदी आणल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करणारे आपले खुपीरे गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील तिसरे गाव आहे, आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर विधवा प्रथा झुगारणाऱ्या कोमल पाटील यांना आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांना खुपीरे गावच्या एक दिवसीय प्रतीकात्मक सरपंच व वैशाली पाटील यांना एक दिवसीय प्रतीकात्मक उपसरपंच करून कोमल पाटील यांच्या हस्ते व वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत आज ध्वजारोहण करण्यात आले विधवा प्रथा झुगारण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचा एक वर्षाचा घरफाळा व पाणीपट्टी ग्रामपंचायत खुपीरे च्या वतीने माफ करण्यात येणार आहे.. सौ दिपाली रमेश जांभळे सरपंच ग्रामपंचायत खुपीरे
धन्यवाद व शतशः आभार खुपीरे येथील हिंदवी ग्रुप व D मेंबर्स या तरुण वर्गाकडून शिवछत्रपती शिवाजी महाराज व लोक राजा शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून "स्वच्छ भारत स्वच्छ खुपीरे" ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या तरुण मुलांनी आज खुपीरे येथील गाव तळे, स्मशानभूमी व वाकरे फाटा कडे जाणाऱ्या आपल्या ओढ्यावरती स्वच्छता मोहीम राबवली. खरोखरच आपल्या मुलांचे जेवढे तोंड भरून कौतुक करावे तितके थोडेच आहे. आपन इथून पुढे हि असेच आपल्या हातून समाजकार्य काम कराल,अशी अपेक्षा व्यक्त करतो,आणी परत एकदा तुमच्या कार्याला मनापासून सलाम करून आमच्या ग्रामपंचायत खुपीरे प्रशासनाकडून आभार व धन्यवाद देतो.