Skip to main content

खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

ग्रामपंचायत खुपिरे

आमच्या विषयी.

कोल्हापूर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेले खुपिरे
गाव क्रीडा व सहकार क्षेत्रात नावाजलेले आहे.

ग्रामपंचायत खुपिरे

कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात भीगावती नदीच्या काठावर बसलेले खुपीरे गाव विशाल तीर्थयात्रेनंतर हीणारी मीठी यात्रा म्हणून कार्तिक यात्रेचा उल्लेख केला जाती. तेथील ग्रामदेवत मारुती आहे. गावच्या दक्षिणेला श्रीराम स्वामी मंदीराचा सुमारे शंभर वर्षापूवीचा मठ आहे.

माझं गांव माझं मंदिर

अध्यात्मिक वसा आणि वारसा लाभलेल्या खूप हिन्यांनी समृध्द असणाऱ्या खुपीरे गावात दर तीन वर्षांनी बिरदेवाची जळ यात्रा भरते… अख्याईकेनुसार सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस धनगर समाज खुपीरे मुक्कामी आला. सांगोल्याहून भिल्लवडी मार्गे अक्कलखोपच्या मसोबाला प्रसन्न करून वारणानगर कोडोली या ठिकाणी धनगाराच्या दोन जोडी राहू लागल्या. तथस्थित स्वयंभू बिरदेव ही लोकरीच्या जाळ्यात विनत खुपीटे येथे आले. इथल्या निसर्गसंपन्न वातावरणात त्यांना रहायला आवडू लागले. मोगरबंच्या या गावातील ठिकाणी ते राहत. मोगराच्या झाडांची गर्दी असलेल्या या भागात मोगरबंच्या असे म्हणतात. या ठिकाणी बिरदेवाने मुक्काम केला. आज गावात 150 हून अधिक उंबऱ्यांचा धनगर समाज राहतो.

खुपिरे हे गाव कोल्हापूर पासून १० कि.मी. अंतर्वर असून कोल्हापूर मुख्यालयापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ६८९२ आहे. यामध्ये पुरुष ३७०२ व स्त्रिया ३१९० असून गावात एकूण १३५२ कुटुंब आहेत. गावामध्ये रस्ते व वाहतूक उत्तम आहेत. तसेच गावात विकास सोसायटीचे जाळे कार्यरत आहेत.    

                      ग्रामपंचायत कार्यालय येथे सेवा नागरीकांना उपलब्ध करून दिली जाते. शैक्षणिक दृष्ट्या गावामध्ये प्राथमिक शाळा, गावाच्या पूर्व दिशेने भोगावती नदी बारमाही वाहते. त्यामुळे जलसिंचनाच्या माध्यमातून गाव समृध्द आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गावामधील लोकांचा व्यवसाय शेती आहे. भात.ऊस, मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गावामध्ये सर्व धर्माचे लोक जसे हिंदू, मुस्लीम, बौद्ध, हरीजन सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात.सर्व धर्मियांचे सन एकत्रित साजरे केले जातात. गावामध्ये हनुमान मंदिर असून ‘क’ वर्ग देवस्थान वर्ग मध्ये आहे. तसेच यास जागृत देवस्थानचा वारसा लाभला आहे. असे हे गाव तालुक्यातील प्रमुख गावांपैकी एक गाव आहे. गावास राजकीय वारसा असून जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्यावर गावातील प्रतिनिधी काम पाहत  आहेत. गावात प्रसिद्ध गाव तलाव आहे. 

निधी स्त्रोत

आमचा गाव आमचा विकास उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना ४ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेप्रमाणे ग्रामपंचायतीना खालील निधी स्त्रोत विचारात घ्यावयाचे आहेत.

ग्रामपंचायतीना विविध करांच्या माध्यमातून प्राप्त होणारा निधी. ( मालमत्ता कर, पाणी कर, व ग्रामनिधी इत्यादी )

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत विकास कामासाठी प्राप्त होणारा निधी

१५ वा वित्त आयोगाचा निधी आणि लोकसहभागातून मिळणारा निधी

राज्य शासनाकडून प्राप्त होणारा महसुली हिस्सा. ( जमीन महसूल उपकार, मुद्रांक शुल्क अनुदान इत्यादी )

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त होणारा निधी

बक्षिसे व पारितोषिके यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीना मिळणारा निधी

खुपीरे

श्री बिरदेव व मसोबा मंदिर

श्री बिरदेव व मसोबा यात्रा, खुपीरे, ता. करवीर

अध्यात्मिक वसा आणि वसा लाभलेल्या खूप हिन्यांनी समृध्द असणाऱ्या खुपीरे गावात दर तीन वर्षांनी बिरदेवाची जळ यात्रा भरते… अख्याईकेनुसार सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस धनगर समाज खुपीरे मुक्कामी आला. सांगोल्याहून भिल्लवडी मार्गे अक्कलखोपच्या मसोबाला प्रसन्न करून वारणानगर कोडोली या ठिकाणी धनगाराच्या दोन जोडी राहू लागल्या. तथस्थित स्वयंभू बिरदेव ही लोकरीच्या जाळ्यात विनत खुपीटे येथे आले. इथल्या निसर्गसंपन्न वातावरणात त्यांना रहायला आवडू लागले. मोगरबंच्या या गावातील ठिकाणी ते राहत. मोगराच्या झाडांची गर्दी असलेल्या या भागात मोगरबंच्या असे म्हणतात. या ठिकाणी बिरदेवाने मुक्काम केला. आज गावात 150 हून अधिक उंबऱ्यांचा धनगर समाज राहतो. श्री शंकाटाचा बारावा रूद्र अवतार म्हणून बिरदेवाने रूप घेतले आहे. बिरदेवाचे लग्न ठरल्यानंतर बिरोबा हे चिंचणी मायाक्का या बहीणीच्या भेटीसाठी चालले होते. वाटेत कृष्णा-कोयना या नदीमध्ये असणाऱ्या सात जणी बहीणींनी त्यांना अडवले. आणि जलामध्ये घेऊन गेल्या. त्या ठिकाणी देवाची हळद काढून केळवाणाचे प्रिती भोजन केले. निरोपाच्या वेळेस सात बहिणींनी भाऊराया पुन्हा कधी भेटणार? असा प्रश्न केला. क्षणभर विचार करून बिरदेवाने दर तीन वर्षानी फाल्गुन महिन्यात मी तुम्हाला भेटेल. असे सांगून यांचवेळी तुमचे आहेर-माहेर करीन असा शब्द दिला. यालाच जल (जळ) यात्रा असे नांव पडत गेले. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्या दिवशी बिरदेवाला महाअभिषेक घातला जातो. बिरदेवाला गोड्या नैवेद्याचा मान आहे. कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातून जवळपास 25 गावातील ढोलवादक एकत्र येऊन जागर करतात. व देव जळास घेऊन जातात. जळाहून आलेनंतर बिरदेव मंदिरात प्रवेश करतेवेळी बकटा बळी देणेची प्रथा आहे. तलवाटीच्या एकाच घावात हा बळी दिला जातो. देवाच्या पाठीमागे असणाऱ्या दैतास ही बलादूरी देणेची प्रथा आहे. रात्री पै-पाहुण्यांना जेवणासाठी निमंत्रण दिले जाते. व सायंकाळी 5 च्या सुमारास सबिना काढला जातो. आणि भंडाऱ्याची उधळण केली जाते. चालू वर्षी देवाच्या भंडाऱ्याच्या पुजेचा मान तुकाराम नागोजी हटाळे, कृष्णात बाबू हटाळे, अवघडी शिंगाडी हटराळे, यशवंत बिरु हराळे यांच्याकडे आहे. यात्रा सफल होण्यासाठी समस्त धनगर समाज यांनी अफार कष्ट घेतले आहे.

श्री बिरदेव व मसोबा मंदिर

ग्रामपंचायत खूपीरे

रामस्वामी मंदिर

ग्रामपंचायत खूपीरे, ता. करवीर येथील रामस्वामी महाराजांची कार्तिक यात्रेला जिल्ह्यातून हजारी भाविक कार्तिक यात्रेत दर्शनासाठी येतात. या यात्रेस शंभर वर्षाची परंपरा आहे.

कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात भीगावती नदीच्या काठावर बसलेले खुपीरे गाव विशाल तीर्थयात्रेनंतर हीणारी मीठी यात्रा म्हणून कार्तिक यात्रेचा उल्लेख केला जाती. तेथील ग्रामदेवत मारुती आहे. गावच्या दक्षिणेला श्रीराम स्वामी मंदीराचा सुमारे शंभर वर्षापूवीचा मठ आहे. त्याकाळी तासगांव तालुक्यातील जुळेवाडी येथून रामस्वामी नावाचे महाराज येथे आले. ग्रामस्थांनी पाटील भावकीचे शेतात पिंपळाच्या झाडाखाली त्यांचे आसनस्थान केले. अवघ्या १५ दिवसां नंतर महाराज तेथून निघून गेले होते. राम स्वामी महाराज कार्तिक स्वामीचे भक्त होते. म्हणून कार्तिक नावाचा गजर व जय करत नागरिकांनी यात्रेला सुरुवात केली. पुढे ती कार्तिक यात्रा नावा रूपाला आली. विशाल तीर्थ याने नंतर येणारया पहिल्या मंगळवारी कार्तिक यात्रा सुरु झाली. पुढे जागरूक देवस्थान म्हणून रामस्वामी मंदीरास महत्व प्राप्त झाले. जिल्ह्यातून भाविक याठिकाणी दर्शनास येऊ लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली रामस्वामी बसले होते. त्या पिंपळ वृक्षालाही महत्व प्राप्त झाले. मंदीरामध्ये रामस्वामी यांची बसण्याची गादी असून या गादीवर त्यांच्या प्रतिमेची पूजन केले जाते. तसेच समीर, त्यांच्या पादकांचेही पूजन केले जाते. भक्तांनी दान केलेल्या रामस्वींच्या घोड्यांच्या मतीचे पूजन केले जाते. पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या महादेवाच्या पिंडीचे पूजन करण्यात येते. मंदीर जुने व छोटे असले तरी कीती मीठी असे ठिकाण आहे. मंदीरामध्ये कर्नाटकातून भक्त म्हणून आलेले हनुमंत मीटनार व त्यांचे वडील यात्रेनिमित्य पूजा बांधत होते. दर्शनासाठी पंचक्रोशीतील खूपीर, साबळेवाडी, शिंदेवाडी, दीनवडे, वाकरे, कुडिने, यवलूज, नीटवडे येथील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्त अन्न धान्य दान करतात. त्यातून सुमारे तीन ते चार किंटल गव्हाची खीर प्रसाद म्हणून वाटली जाते. हा मुख्य यात्रेचा दिवस शाकाहारी दिवस म्हणून पाळला जाती. मंदीर समिती तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते. यात्रेस राम्स्वमीचा घीडा हे प्रमुख श्रद्धा स्थान म्हणून यात्रेदिवशी उपस्थित असते.

तसेच प्रत्येक आमावस्या व पौर्णिमेला पंचकोशीतील भाविकांची गदी असते. रामनवमीस ही भाविकांची प्रचंड गदी असते व त्यादिवशी मंदीर कमिटी तप महाप्रसादाचे आयोजन केले जाते. अशा प्रकारे शंभर वर्षाचे परंपरा असणारी रामस्वामी मंदीर आहे.

मठ परिसरात याठिकाणी कै. दत्तू रामा पाटील, कै.धोंडी येसबा पाटील, कै. रामा येसबा पाटील यांची शेतजमीन आहे. त्यामधील या लोकांनी स्वमालकीची २० गुंठे शेतजमीन मठासाठी सीडले आहे  तेथे ७० ते ८० वर्षापूवी मठ बांधण्यात आला. त्या मठाची २०२१ मध्ये पडझड होऊन मटाची एक मिंत पडली.

वर्षाला कार्तिक यात्रेला मा. आमदार नरके साहेब आवर्जुन भेट द्यायचे व प्रत्येकाचे मठातील जागा ग्रामपंचायतच्या नावावर करा व मी काय लागेल तेवढा फंड लावती. त्यानंतर पाटील भावकीने २ गुंठे जागा ग्रामपंचायत खुपीरेच्या नावे स्वखर्चाने केली. त्यानंतर मंदिराला ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून दर्जा पण मिळाला. त्यानंतर श्री. संजय बळवंत पाटील (दादा) यांच्या प्रयत्नातून खा. संजय मंडलिक यांच्या फंडातून २१ लाख रुपये व मा. आम. चंद्रदिप नरकेसी यांच्या विशेष पर्यत्नातून १२ लाख रुपये निधी प्राप्त झाला. व मंदिराच्या बांधण्यास ख-या अर्थानी सुरवात झाली मंदीरातील गाभारा बांधकाम, फरशी, दगडी कमान व मूती साठी पाटील भावकी तसेच गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीनी व भक्तींनी सरळ हातानी मदत केली. व मंदीर पूर्णत्वास आले. याबद्दल श्री रामस्वामी मठ व्यवस्थापन समिती सर्व देणगीदाराचे शतशः आभारी आहे,

|| श्री राम स्वामी मठ ||

खुपिरे

श्री मारुती मंदिर

मारुती मंदिर – फार प्राचीन काळातील मंदिर असून नवसाला पावणारा आहे. दसऱ्यात नऊ दिवस मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम केले जाते. दसऱ्यामध्ये मारुती व बिरदेव यांच्या पालखीची भेट होते. भेटीचे दर्शन घेण्यासाठी आसपासच्या गावातील सर्व भक्त उपस्थित राहतात.

श्री मारुती मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे

श्री महादेव मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

श्री महादेव मंदिर

महादेव मंदिर – महादेव मंदिर देखील प्राचीन मंदिर असून श्रावण महिन्यामध्ये तसेच प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात.

खुपिरे

श्री म्हसोबा मंदिर

मसोबा मंदिर – गाव तलाबाकाठी हे मंदिर छोटेखानी गावातील लोकांचे आराध्य स्थान आहे. पोळ्यामध्ये यात्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात केला जातो.

श्री म्हसोबा मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे 

श्री ज्ञानेश्वर मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

श्री ज्ञानेश्वर मंदिर

ज्ञानेश्वर मंदिर व विठ्ठल मंदिर – वारकरी मंडळ तसेच गावातील लोकांचे महत्त्वाचे स्थान आहे. एप्रिल मध्ये ७ दिवसाचा पारायण सोहळा साजरा केला जातो. तसेच ७ दिवस कीर्तनाचे प्रवचन व धार्मिक कार्यक्रम असतात.

खुपिरे

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

विठ्ठल रुक्मिणी मंदिर: हे मारुती मंदिराच्या पूर्वेला आहे. गुरव समाज या मंदिराची पूजा करतो.

  • विशेष कार्यक्रम: श्रावण महिन्यात ७ दिवसांचा ‘वारकरी संप्रदाय पारायण सोहळा’ होतो. तसेच मार्च महिन्यात मोठा सांप्रदायिक सोहळा, कीर्तन आणि प्रवचन आयोजित केले जातात.
    काटकर महाराजांचे मंदिर: हे मंदिर करवीर (पाडळी रोड) वर आहे. काटकर समाज या मंदिराची व्यवस्था आणि पूजा पाहतो.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे 

संत निरंकारी मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

संत निरंकारी मंदिर

संत निरंकारी मंडळ – याची स्थापना संतराम आर व दत्तात्रय आर या दोघा भावांनी घरामध्ये सुरू केली. आता या मंडळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून आता सत्संग भवन आता मोठे बांधलेले असून प्रत्येक गुरुवार व रविवार सत्संग चालतो.

खुपिरे

हरिजन समाज मंदिर

हरिजन वसाहत समाज मंदिर – हरिजन वसाहत मध्ये प्रतिष्ठित मंदिर असून त्यामध्ये त्या समाजातील सगळे कार्यक्रम साजरे केले जातात.

हरिजन समाज मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे 

श्री गजलक्ष्मी मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

श्री गजलक्ष्मी मंदिर

श्री गज लक्ष्मी – गावच्या मुख्य चौकात अत्यंत देखणे मंदिर असून गावातील लोक दररोज दर्शन घेतात. तसेच पाडव्यादिवशी पाडवा वाचन केले जाते व लिंब खाल्ला जातो.

खुपिरे

श्री ज्योतिर्लिंग मंदिर

जोतिबा मंदिर – गावातील प्राचीन मंदिर असून गुरव गल्लीमध्ये मंदिर असून दररोज भक्त दर्शनासाठी येतात व प्रत्येक रविवारी भक्तांची संख्या जास्त असते.

श्री ज्योतिर्लिंग मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे 

श्री मरगुबाई मंदिर, खुपिरे

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

श्री मरगुबाई मंदिर

मरगुबाई मंदिर – मरगुबाई मंदिर प्राचीन असून श्रावण महिन्यात तिसऱ्या गुरुवारी घुगाऱ्याचा कार्यक्रम महिला वर्ग मोठ्या उत्साहात करतात.

खुपिरे

श्री स्वामी समर्थ मंदिर

स्वामी समर्थ – हे मंदिर लक्ष्मी दूध डेअरी जवळ मेन रोड वर असून प्रत्येक गुरुवार स्वामी समर्थ यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. स्वामीचे कार्यक्रम साजरे करतात.

श्री स्वामी समर्थ मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे 

छत्रपती श्री शिवाजी महाराज

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

छत्रपती श्री शिवाजी महाराज

स्थापना – 

खुपिरे

छत्रपती श्री शाहु महाराज

स्थापना – 

छत्रपती श्री शाहु महाराज

ग्रामपंचायत खुपिरे 

श्री दत्त मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

श्री दत्त मंदिर

दत्त मंदिर – हे ग्रामीण रुग्णालय जवळ असून येथे प्रत्येक गुरुवारी भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. दत्त जयंती दिवशी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

खुपिरे

श्री बालाजी मंदिर

बालाजी मंदिर: हे मंदिर ‘नंदीवाले वसाहत’ मध्ये आहे. नंदीवाले समाजातील लोक या मंदिरात श्रद्धापूर्वक पूजा-अर्चा करतात.

श्री बालाजी मंदिर

ग्रामपंचायत खुपिरे 

श्री गणेश मंदिर (खडे गल्ली)

ग्रामपंचायत खुपिरे

खुपिरे

श्री गणेश मंदिर (खडे गल्ली)

गणपती मंदिर (खडे गल्ली): येथील गणपती ‘नवसाला पावणारा’ मानला जातो. संकष्टीला महिला येथे मोठी पूजा करतात. गावातील नागरिक भक्तीभावाने येथे येतात.

खुपिरे

श्री गणेश मंदिर (सुतारवाडा)

गणपती मंदिर (सुतारवाडा): पूर्वी सुतारवाड्यात रस्त्यालगत चाफ्याचे झाड होते. बळवंत सुतार यांनी त्या झाडावर गणपतीची मूर्ती कोरली, तेव्हापासून तेथे पूजा–अर्चा सुरू झाली. हा गणपती ‘नवसाला पावणारा‘ म्हणून ओळखला जातो.

श्री गणेश मंदिर (सुतारवाडा)

ग्रामपंचायत खुपिरे